Sangli News | शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे गुरुवार, दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरण पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
शिवाजी आप्पा पाटील यांच्या जुन्या घरातील विद्युत मीटरमध्ये अचानक ठिणग्या पडू लागल्या. या ठिणग्या खाली साचलेल्या कचऱ्यावर पडताच आग भडकली. काही क्षणातच आग जवळच ठेवलेल्या वैरणीपर्यंत पोहोचली आणि आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेत घरातील रंगकाम, प्लास्टर, विद्युत वायरिंग, प्लंबिंग साहित्य तसेच जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिल पाटील, प्रकाश पाटील, निवास पाटील, विलास पाटील, अनिकेत कदम आणि सर्जेराव घेवदे यांनी तत्परतेने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच राजेंद्र पाटील, वीज वितरण विभागाचे अधिकारी आर. डी. रसाळ, सुनील पाटील तसेच तलाठी सुरैया शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
हेही वाचा: वाळवा तालुक्यात पुन्हा वाढली बिबट्याची दहशत; मेंढ्यांच्या कळपावर हल्ला.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










