Sangli News | सांगली : उरण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने जोरदार कामगिरी करत आपली एकहाती सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नगराध्यक्ष पदासह तब्बल 23 जागांवर विजय मिळवला असून, महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. निवडणूकपूर्व काळात जयंत पाटील यांना आव्हान देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले, मात्र मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. निकालातून उरण ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गटाचा) राजकीय दबदबा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून श्री. आनंदराव मलगुंडे यांनी नगराध्यक्ष पदावर विक्रमी विजय मिळवला. पक्षाच्या बूथस्तरीय नियोजन, कार्यकर्त्यांचे संघटन आणि विकासकेंद्री प्रचार याचा थेट फायदा मतपेटीतुन दिसून आला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट आणि काँग्रेसच्या विकास आघाडीला मिळून केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या नगरपरिषदेत महायुतीचे गणित पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांच्या निकालांमधूनही राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सत्ता मिळवली असून, पलूस नगरपरिषदेत काँग्रेसने विजय मिळवत आपला प्रभाव कायम राखला आहे.
उरण ईश्वरपूरच्या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे मनोबल वाढले असून, जिल्हा व राज्य पातळीवर याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: अंत्री बुद्रुकमध्ये शॉर्टसर्किटमुळे घरास आग; मोठे नुकसान, अनर्थ टळला.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










