Sangli Flood Relief News | जत (सांगली) : जत विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांची पिके तसेच गावकऱ्यांची घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पडळकर यांनी हळ्ळी येथे जाऊन पिकांचे झालेले नुकसान आणि गावातील सुमारे ६० ते ७० घरांची पडझड याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पंचनामे सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी खात्री दिली की, “नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांनी चिंता करू नये, शासनाकडून निश्चितपणे भरपाई देण्यात येणार आहे.”
जिल्ह्यातील अनेक भागात परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि गावकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून सर्व नुकसानग्रस्त गावांत तातडीने पंचनामे करण्यात येतील, आणि नुकसान भरपाई देण्यात येईल अशी हमी पडळकरांनी दिली.
हेही वाचा: राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला पावसाचा यलो अलर्ट.