Sangli Crime : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह; सहाजणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

जत : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पीडित अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याची माहिती असूनही आई-वडील, सासू-सासरे आणि भटजी यांनी संगनमताने तिचा विवाह राहुल पांडुरंग गेजगे याच्याशी लावून दिल्याचा आरोप आहे. विवाहानंतर पतीकडून शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याने पीडिता गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पती राहुल पांडुरंग गेजगे याच्यासह मुलीची आई ताई समाधान पारसे, वडील समाधान कुंडलिक पारसे, सासू रुक्मिणी पांडुरंग गेजगे, सासरा पांडुरंग शंकर गेजगे आणि विवाह लावून देणारा भटजी अर्जुन गुरव यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा व संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचे वय माहीत असतानाही विवाह लावून देण्यात आल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांचे सांगलीकरांना आवाहन.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा