Kavathe Ekand : कवठेएकंद येथे शोभेच्या दारूचा स्फोट; आठ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Kavathe Ekand Firecracker Blast 2025

Kavathe Ekand News | सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद (ता. तासगाव) येथे रविवारी दसऱ्याच्या पारंपरिक सोहळ्यासाठी तयार केल्या जात असलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ जण भाजून जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींमध्ये आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६), आनंद नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २८), अंकुश शामराव घोडके (वय २१), प्रणव रवींद्र आराधे (वय २१), ओमकार रवींद्र सुतार (वय २१) व सौरभ सुहास कुलकर्णी (वय २७) यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, गावातील ब्राह्मण गल्लीतील पत्र्याच्या शेडमध्ये मंडळाचे कार्यकर्ते शोभेची दारू तयार करत होते. चाचणीदरम्यान अचानक दारूने पेट घेतला आणि स्फोट झाला. यामुळे मोठी दुर्घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गावात दसऱ्यानिमित्त शोभेच्या दारूचे प्रदर्शन करण्याची दीर्घ परंपरा आहे. पालखी सोहळ्यात मानकऱ्यांच्या उपस्थितीत दारूकाम सादर केले जाते. मात्र या दुर्घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून सोलापूर पूरग्रस्तांना मदत.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.