Miraj Politics : माजी महापौरांच्या मनधरणीसाठी खासदार विशाल पाटील मैदानात; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Miraj Politics MP Vishal Patil Meets Ex Mayors Municipal Election | फोटो सौजन्य : vishalpatil13 (Instagram)

Sangli News | मिरज : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मिरजेतील माजी महापौर किशोर जामदार व माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी माजी महापौर किशोर जामदार तसेच माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मिरज आणि सांगलीतील राजकीय स्थितीवर चर्चा करत भाजपविरोधी ताकदी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

खासदार विशाल पाटील म्हणाले की, सांगली जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून भाजप सत्तेत असतानाही महापालिकेला अपेक्षित विकासनिधी मिळालेला नाही. “भाजप सत्तेत असूनही सांगली-मिरज महापालिकेसाठी मागील दीड ते दोन वर्षांत कोणताही ठोस निधी देण्यात आलेला नाही,” असा आरोप त्यांनी केला.

भाजपविरोधी पर्याय मजबूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि इतर समविचारी पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “माजी नगरसेवक व नेत्यांच्या काही अडचणी असतील, त्या समजून घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडे जाण्याचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही,” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते संजय बजाज यांनीही माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची भेट घेतली असून, त्यांच्याशी संवाद सुरू आहे. पुढील एक-दोन दिवसांत या भेटींनंतर निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मिरज व सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हेही वाचा: कुष्ठरोगग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे सांगली जिल्हा परिषद; वसाहती व रुग्णालयाला सीईओंची भेट.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा