मिरज : शिवजयंतीनिमित्त गुरुवारी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरात सादर करण्यात आलेल्या ‘श्रीमंतयोगी’ महानाट्याने प्रेक्षकांना अक्षरशः चारशे वर्षे मागे नेले. अडीच तास विना-मध्यंतर सादर झालेल्या या प्रयोगाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
सांगलीतील स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या या नाट्यात शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग रंगमंचावर उभे करण्यात आले. जिजाऊंचा कणखरपणा, तानाजी मालुसरेंचा पराक्रम, तुकोबारायांचा प्रसंग अशा अनेक दृश्यांना प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळाला. नृत्य, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनाही आकर्षक होती.
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कलाकारांचे कौतुक करत शिवरायांची तत्त्वे केवळ वाचून न थांबता ती आचरणात आणण्याचे आवाहन केले. लेखक राजेंद्र पोळ यांच्या संहितेचा आणि कलाकारांच्या ऊर्जेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: संजयनगरमध्ये जावयाचा संताप; ‘बायकोला माहेरहून परत पाठवा’ म्हणत सासूवर लोखंडी कड्याने हल्ला.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









