तासगाव (सांगली) : माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी राजकारणाची परंपरा जोडली गेली आहे. पण या घराण्यातील राहुल राजाराम पाटील यांनी राजकारणाऐवजी साहित्याच्या वाटेवर आपली स्वतंत्र छाप सोडली आहे. सातारा जिल्ह्यातील ‘माझ कवितेच गाव, जकातवाडी राजधानी’ या साहित्य चळवळीच्या पुणे विभाग उपाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे.
संस्थेच्या निवड समितीने राहुल पाटील यांची साहित्यप्रेमी वृत्ती, कवितेतील रसिकता आणि सांस्कृतिक उपक्रमांतील सहभाग यांचा विचार करून एकमताने निर्णय घेतला. ‘माझ कवितेच गाव’ ही संस्था ग्रामीण भागातील उदयोन्मुख कवी व लेखकांना प्रोत्साहन देत असून, साहित्य आणि समाजकार्याच्या जोडीतून सांस्कृतिक चळवळ निर्माण करण्याचे ध्येय बाळगते.
राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक तरुण कवी साहित्याच्या प्रवाहाशी जोडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पाटील कुटुंब साहित्यविश्वातुनही चर्चेत आले आहे.
🔴 हेही वाचा 👉 ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत ६८१ आरोग्य शिबिरे; ३६ हजार नागरिकांची तपासणी.