Sangli Pollution : कृष्णा–वारणा नदी प्रदूषणावर कारवाई; ४३.१८ कोटी दंड

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Krishna Warana River Pollution Action Fine

Sangli Pollution News Today | सांगली : कृष्णा व वारणा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील सहा महिन्यांत मोठी कारवाई केली आहे. एकूण ३२ उद्योगांना कारणे दाखवा नोटिसा, ४४ उद्योगांना निर्देश तर २५ उद्योगांनाl अंतरिम आदेश देण्यात आले आहेत.

यात पाच साखर कारखान्यांसह फौंड्री, रासायनिक व पोल्ट्री उद्योगांचाही समावेश आहे. या कारवाईत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला ३३.६० कोटी, आष्टा व इस्लामपूर नगरपालिकांना प्रत्येकी २.४० कोटी, सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ४.३२ कोटी, श्री दत्त इंडिया प्रा. लि. ला ४२.३० लाख व स्वप्नपूर्ती आसवनी प्रकल्पास ३.६० लाख रुपये असा एकूण ४३.१८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई मुख्यालयाकडून मिळालेल्या यादीप्रमाणे आणि प्राप्त तक्रारींनुसार संबंधित उद्योगांची नियमित पाहणी करून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: मल्लेवाडीत एकाच रात्रीत मंदिरासह चार घरांत चोरी; लाखोंचा ऐवज लंपास.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा