सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2025–26 चा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले असून, शिवसेना (शिंदे गट) सोबत सत्ता स्थापन केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटालाही सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचे संख्याबळ 41 वर पोहोचते आणि बहुमतासाठी आवश्यक असलेली 40 ची संख्या आधीच पूर्ण होते. त्यामुळे शिवसेनेसह सत्ता स्थापन करणे स्वाभाविक असल्याच ते म्हणाले.
अजित पवार गटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील स्थानिक नगरसेवकांनी तसा प्रस्ताव दिल्यास आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यास, त्यांचेही स्वागत केले जाईल. मात्र, याबाबतचा निर्णय हा त्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि वरिष्ठांशी होणाऱ्या चर्चांवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेतील सध्याच्या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाने 39 जागांवर विजय मिळवला असून, शिवसेना (शिंदे गट) ने 2, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने 16, काँग्रेसने 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने 3 जागा मिळवल्या आहेत. या निकालामुळे बहुपक्षीय सभागृह तयार झाले असून, सत्तास्थापनेसाठी विविध पर्याय खुले असल्याचे स्पष्ट आहे.
सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय हा संबंधित पक्षांच्या स्थानिक नेत्यांतील चर्चा, वरिष्ठ पातळीवरील समन्वय आणि अधिकृत बैठकीनंतर स्पष्ट होणार असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: आयटी पार्क, विमानतळ, सेफ सिटी—भाजपच्या जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार?.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










