मिरज : मिरज शहरातील ख्वॉजा शमना मीरासाहेब दर्गा, अर्थात मीरासाहेब दर्गा येथे सुरू असलेला वार्षिक ६५१ वा उरूस आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार आज, १९ जानेवारी रोजी सकाळी कुराणख्वानीचा कार्यक्रम पार पडला असून, उरूसाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उरूसाची सुरुवात २१ डिसेंबर २०२५ रोजी मगरीबनंतर ‘रसमे सिद्दी’ या परंपरागत विधीने झाली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात रसमे मांडूप, चिराग रोशनाई, जुलूस-ए-संदल व मेहफिले समा, चांबर गिलाफ, संदल माळी असे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम क्रमाक्रमाने पार पडले.
उरूस काळात मीरासाहेब दर्गा परिसरात महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. संपूर्ण उरूस कालावधीत श्रद्धा, शांतता आणि शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळाले. प्रशासन व दर्गा व्यवस्थापनाकडून आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
आज रात्री होणाऱ्या कव्वाली कार्यक्रमाने ६५१ व्या उरूसाचा शेवटचा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.
मिरजेत उरूसाच्या निमित्ताने दर्गा परिसरात केवळ मुस्लिम समाजच नव्हे, तर इतर सर्व धर्मीय भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली. मिरज शहरातील परंपरेने चालत आलेली सर्वधर्मीय सहभागाची संस्कृती आणि सामाजिक सलोखा यावेळीही दिसून आला.
हेही वाचा: काँग्रेसकडून एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी; दोघांचाही मोठ्या मताधिक्याने विजय.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










