Sangli News : संख येथे २०० हेक्टरमध्ये उभारणार हजार कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Sankh Solar Project (प्रतिकात्मक फोटो)

Sangli Sankh Solar Project | सांगली : सांगली जिल्ह्यातील संख (ता. जत) येथे तब्बल २०० हेक्टर क्षेत्रावर हजार कोटी रुपये खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्णपणे सौरऊर्जेवर चालवली जाणार असून, नोव्हेंबरमध्ये या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा सर्वात मोठा खर्च विजेच्या बिलावर आहे. वारंवार थकीत बिलामुळे योजना बंद ठेवावी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संख येथे हा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे.

या प्रकल्पात २०० मेगावॉट क्षमतेची वीज निर्मिती होणार असून, म्हैसाळ योजनेसाठी लागणारे ९६ मेगावॉट वीजेचे संपूर्ण समाधान होणार आहे. पाणी आवर्तनाशिवाय अन्य काळात तयार होणारी वीज महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाचे काम २०२६ च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता असून, २०२८ च्या जून महिन्यापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा अंदाज आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतही सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जर्मन बँकेचा निधी उपलब्ध झाला असून, कृष्णा खोरे महामंडळामार्फत प्रकल्प राबवला जाणार आहे.

हेही वाचा : बिटकॉईन मधून नफा मिळवून देण्याचे आमिष, आईचे पाच तोळ्याचे गंठण गहाण ठेवले.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा