सांगली : तासगाव तालुक्यातील सावळज येथे सेवानिवृत्त शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत अज्ञात भामट्यांनी तब्बल 59 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावळज येथील सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब पाटील (वय 61) यांना अज्ञात व्यक्तींनी फोन करून स्वतः टेलिकॉम अधिकारी व पोलीस असल्याचे सांगितले. त्यांच्या आधार कार्डवरून सिमकार्ड घेऊन महिलांना त्रास दिल्याचा आरोप असल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली.
यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच ‘सुप्रीम कोर्ट ऑडिट’साठी खात्यातील पैसे तपासण्याची गरज असल्याचे सांगून बँक खात्यांची माहिती मागवण्यात आली.
भामट्यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँकेत असलेल्या ठेवी मोडून आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या खात्यांवर 59 लाख 9 हजार रुपये पाठवले.
नंतर संशयित आरोपींकडून आणखी पैसे मागितले जात असल्याने संशय आल्यावर फिर्यादी यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवली.
या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: विद्यार्थिनीचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल.
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या
- 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर









