Sangli Zilla Parishad Meeting: विकासकामांच्या मंजुरीच्या डेडलाईनमुळे सांगली जिल्हा परिषदेची २६ नोव्हेंबरची सभा लांबणीवर; पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ३ डिसेंबरला होणार बैठक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्हा परिषदेच्या प्रलंबित विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेमुळे २६ नोव्हेंबरची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र).

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या प्रलंबित विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी दिलेली ३० नोव्हेंबरची अंतिम मुदत पाळण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आली असून, तब्बल पाच महिन्यांच्या खंडानंतर आता ३ डिसेंबर रोजी ही बैठक होण्याची दाट शक्यता प्रशासकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या कामांना यापूर्वीच मोठा विलंब झाला असल्याने शासनाने प्रशासकीय मान्यता पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. सर्वसाधारण सभेच्या कामकाजामुळे या तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सभेची तारीख पुढे ढकलण्याचा मार्ग निवडला आहे. विशेष म्हणजे, आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर २६ नोव्हेंबरच्या सभेसाठी संबंधित विभागाकडून नोटीस तयार करण्यात आली होती; परंतु त्यावर अंतिम स्वाक्षरी होऊन ती पदाधिकारी किंवा सदस्यांना रवाना करण्यात आली नव्हती.

नियमानुसार दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १६ जुलैपासून होऊ शकलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात नियोजित असलेली बैठक शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लांबणीवर पडली होती. सभा सातत्याने पुढे जात असल्याने ग्रामीण भागातील विविध प्रश्न आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सदस्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत असून, आता ३ डिसेंबरच्या बैठकीत कोणते विषय प्राधान्याने घेतले जातात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: राज्यातील मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये; आता ‘महाडीबीटी २.०’ पोर्टलवरून घरबसल्या करता येणार ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या नवे नियम.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा