जिल्हा परिषद विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य बजावावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (फाइल फोटो)

सांगली : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी आपापली नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पार पाडावीत, अशा सूचना पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

जिल्हा परिषद सांगली येथे जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर आयुक्त (आस्थापना) पुणे नितीन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार यांनी आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या मूलभूत सेवांबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे, असे सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना उद्दिष्टे ठरविलेल्या कालावधीत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेबाबत सातत्य ठेवावे, तसेच वृक्षारोपणास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात उद्योग सुरू होण्यासाठी असलेल्या अडचणी ओळखून त्या सोडविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

आयुक्त तपासणीदरम्यान नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांबाबत संबंधितांनी सखोल तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी. शासकीय निधीच्या वापराबाबत कोणतीही अनियमितता आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. दिव्यांगांसाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

बैठकीत जिल्हा परिषद कार्यालय तपासणीचे अहवाल वाचन अपर आयुक्त नितीन माने यांनी सादर केले. यावेळी आस्थापना, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, शिक्षण, समाजकल्याण, मनरेगा, बांधकाम विभाग आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप, दिव्यांग व्यक्तींना उपकरणांचे वितरण, तसेच प्रशासकीय कामकाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: सांगलीतील काळीखण येथे सुरू झालेल्या ‘The Evening Retreat’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा