Tadpatri Anudan Yojana Maharashtra 2025 | सांगली : महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेतुन शेतकऱ्यांना ५०% पर्यंत अनुदान मिळणार आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील अनिश्चित बदल आणि पिकांचे होणारे नुकसान यापासून संरक्षण करण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे.
ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत ताडपत्रीच्या एकूण किंमतीपैकी अर्धी रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार असून उर्वरित रक्कम सरकारकडून थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात पिकांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.
या अनुदान योजनेचे फायदे म्हणजे पिकांचे हवामानापासून संरक्षण, आर्थिक बचत, ताडपत्रीचा बहुपयोग (घरगुती कार्यक्रम, धान्य गोदामे, बाजारपेठेत तात्पुरती स्टॉल्स आदींसाठी) होणार आहे.
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ७/१२ उतारा, आधार कार्ड, जातप्रमाणपत्र (SC/ST असल्यास) आणि बँक खाते तपशील आवश्यक आहे. पात्र शेतकरी http://www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा तालुक्यातील कृषि कार्यालयात संपर्क साधू शकतात.
हेही वाचा: जयंत पाटील यांची राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.