Marriage Fraud: लग्नाच्या पहिल्याच रात्री बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने नववधू पसार; विवाह फसवणूक प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Tasgaon Marriage Fraud Dhawali Bride Absconded First Night | प्रातिनिधिक छायाचित्र

Sangli News | तासगाव : तासगाव तालुक्यातील ढवळी गावात विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू घरातून पसार झाल्याने नवरदेवाची सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढवळी येथील रहिवासी सोमनाथ अशोक चव्हाण (वय 35) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, परभणी जिल्ह्यातील नांदगाव (पांढरी) परिसरातील काही व्यक्तींनी विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, ऊसतोड मजूर आणण्यासाठी परभणी भागात गेलेल्या नातेवाईकांमार्फत ओळख झाल्यानंतर वधूचा फोटो दाखवण्यात आला. बोलणीनंतर विवाहास होकार देण्यात आला. मात्र, लग्नासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर अडीच लाख रुपये देण्याचे ठरले आणि ही रक्कम रोख स्वरूपात वधूकडील व्यक्तींना देण्यात आली.

ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. रीतीरिवाजानुसार नववधूला मंगळसूत्र, पैंजण व इतर सौभाग्य अलंकार देण्यात आले. लग्नानंतर वधूकडील नातेवाईक गावी परतले, तर नववधू आणि तिची पाठराखण करणारी एक महिला सासरी थांबल्या.

मात्र, मध्यरात्री बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने दोघी घराबाहेर पडल्या आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाल्या. सकाळपर्यंत शोध घेऊनही त्या न सापडल्याने विवाह फसवणूक झाल्याचे उघड झाले.

या प्रकरणी वधू, तिची आई, विवाह जुळवून देणारा मध्यस्थ, पाठराखण करणारी महिला आणि आणखी एका नातेवाईकाविरोधात फसवणूक व संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: महायुतीतील जागावाटपावर आज तोडगा? राष्ट्रवादीची 30 तर शिंदेसेनेची 20 जागांची मागणी; आज सांगलीत निर्णायक बैठक.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा