Tasgaon Election Result : तासगावमध्ये ‘काका गटाचे’ जोरदार पुनरागमन; संजय काका पाटलांनी पुन्हा एकदा सिद्ध केली राजकीय ताकद

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Tasgaon Nagarparishad Election Result Sanjay Kaka Patil ViVictory | Photo: Sangli Today

Sangli Today | तासगाव : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव नगरपरिषद निवडणुकीत जोरदार पुनरागमन करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवार विजया बाबासाहेब पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 99 मतांनी विजय मिळवत काका गटाला दिलासा दिला आहे.

नगराध्यक्षपदाच्या लढतीत विजया पाटील यांना 9,451 मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत मिळालेल्या या विजयामुळे तासगावच्या राजकारणात काका गटाचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही काका गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत.

एकूण 24 जागांच्या नगरपरिषदेत काका गटाचे 13 नगरसेवक, तर आमदार रोहित पाटील यांच्या गटाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान, भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून पक्षाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे आणि जाफरभाई मुजावर यांचा पराभव हा या निवडणुकीतील महत्त्वाचा राजकीय धक्का मानला जात आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना नूतन नगराध्यक्षा विजया पाटील यांनी तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तासगाव नगरपरिषदेच्या या निकालामुळे सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा काका गटाची ताकद अधोरेखित झाली असून, आगामी राजकीय घडामोडींवर या निकालाचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: सावर्डेत अज्ञाताने एक एकर द्राक्षबाग जाळली; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा