Sangli Crime News | जत (सांगली) : उमदी येथे भरदिवसा झालेल्या धक्कादायक प्रकारात एका ज्येष्ठ पत्रकारावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. मलकारी दत्तात्रय वायचळ (वय ६८, रा. बसवेश्वर मंदिराजवळ, उमदी) असे जखमींचे नाव असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी स्थानिक हॉटेलमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गजेंद्र ऊर्फ गजू बाळासाहेब वायचळ (वय ५६, रा. उमदी) याने धारदार शस्त्राने हल्ला केला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजेंद्र याचे सायकल दुरुस्तीचे दुकान असून, मलकारी वायचळ यांचे पेपर विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी संशयिताच्या दुकानात चोरी झाली होती. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेल्यावर मलकारी वायचळ यांच्या दबावामुळे पोलिसांनि तक्रार नोंदवून घेतली नाही. असा संशय मनात धरून गजेंद्र याने वायचळ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सांगलीच्या ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलिस करत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 पोलीस ठाण्यात ताब्यातील आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक.