ट्रॉलीला ओव्हरटेक करताना मागून एसटीची धडक; विट्यात 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
विटा–कराड मार्गावरील अपघाताचे प्रतीकात्मक छायाचित्र.

विटा : विटा–कराड मार्गावर असणाऱ्या महालक्ष्मी कृषी उद्योग समूहासमोर रविवारी (१ मार्च) सकाळी झालेल्या अपघातात 66 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना मागून आलेल्या एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

अंकुश तुकाराम नलवडे (वय 66, रा. विटा, ता. खानापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या  दुचाकीवरून कराडकडून विट्याकडे येत होते. ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना मागून येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

बसच्या धडकेत नलवडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी विट्यातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

विटा पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: भाजी महाग, चिकन स्वस्त? सांगलीत गवारीच्या दराने ग्राहक हैराण.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा