वांगी एसटी बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाचा रस्ता बंद होण्याची भीती; निकृष्ट बांधकामाच्या चौकशीसह काम थांबवण्याची मागणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
वांगी (ता. कडेगाव) येथील एसटी बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. (प्रतिनिधिक छायाचित्र)

कडेगाव (सांगली टुडे वृत्तसेवा): कडेगाव तालुक्यातील मौजे वांगी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या बांधकामामुळे स्वातंत्र्यसैनिक कै. एकनाथजी श्रीपती मोहिते यांच्या कुटुंबाच्या घराकडे जाणारा रस्ता बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

वांगी येथील एसटी बसस्थानकाच्या उभारणीसाठी स्वातंत्र्यसैनिक कै. एकनाथजी श्रीपती मोहिते यांनी सार्वजनिक हितासाठी स्वतःची जमीन दिली होती. त्यांच्या या त्यागामुळे गावातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, आता त्याच बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या घराकडे येण्या-जाण्याचा मार्ग संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे बाधित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँक आवारात तणाव; अध्यक्ष महेंद्र लाड यांच्या पुत्राची पत्रकारांशी हुज्जत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

निकृष्ट बांधकामाच्या तक्रारी आणि आंदोलनाचा इशारा

या संदर्भात भाजप किसान मोर्चाचे सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. विशाल हणमंतराव मोहिते यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, परिवहन मंत्री, सांगलीचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या निवेदनात बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचे आणि शेडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

संबंधित जमिनीची कागदपत्रे, पूर्वीचा वापरातील रस्ता आणि मंजूर आराखडा यांची संयुक्त पाहणी होईपर्यंत संरक्षक भिंतीचे काम तात्काळ थांबवावे, स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाला कायमस्वरूपी रस्ता खुला ठेवावा आणि स्वतंत्र तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत बांधकामाच्या दर्जाची चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास वांगी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा: उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे? आता तहसील कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही; फक्त १५ दिवसांत घरबसल्या मिळवा प्रमाणपत्र, पहा लागणारी कागदपत्रे.

📢 सांगली जिल्ह्यातील तालुकास्तरीय घडामोडी, ग्रामस्थांचे प्रश्न आणि प्रशासकीय निर्णय सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा