Warna Koyna Dam Earthquake | सांगली : वारणा धरण परिसरात मंगळवारी (दि. ३०) मध्यरात्री भूकंपाची नोंद झाली. वारणावती (ता. शिराळा) येथील भूकंप मापक केंद्रावर १२ वाजून ९ मिनिटांनी ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप नोंदला गेला.
भूकंपमापक केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर होता. सौम्य तीव्रतेमुळे परिसरात कोणालाही कंपन जाणवले नाही तसेच कोणतीही जीवित हानी किंवा नुकसान झाल्याची नोंद नाही.
दरम्यान, कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. याचा केंद्रबिंदू कोयना खोर्यातील हेळवाक गावाच्या नैऋत्येला सुमारे ६ किलोमीटर अंतरावर, तर कोयना धरणापासून ४ किलोमीटरवर होता.
दोन्ही ठिकाणी नोंदलेले भूकंप सौम्य स्वरूपाचे असल्याने स्थानिकांना घाबरण्याचे कारण नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: केंद्राची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने आपल्या निधीतून सुरू केली मदत; शेतकरी व पूरग्रस्तांना दिलासा.