सांगली : कसबेडिग्रज (ता. मिरज) परिसरात अवैधरित्या गौण खनिज मातीची वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस येताच महसूल विभागाने मोठी कारवाई केली. अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्या पथकाने छापा टाकून दोन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी जप्त केला आहे.
कारवाईदरम्यान परवाना नसताना सुमारे सहा ब्रास मातीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सुशांत सुरेश कदम यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावर ₹9 लाख 59 हजार 690 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेली वाहने महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. अवैध उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असल्याने अशा प्रकारांवर कठोर पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे आणि नायब तहसीलदार मनोहर पाटील यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पुढील काळातही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा: भाजप उमेदवार निवडीसाठी 13–14 डिसेंबरला मुलाखती; 20 प्रभागांतील इच्छुकांची छाननी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










