Sangli News | ईश्वरपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी सांगलीवाडी टोलनाक्याजवळ चारजण चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, तब्बल 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने, रोकड आणि दोन दुचाकी आढळून आल्या.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये
प्रदीप हणमंत थोरात (रा. बोरगाव, ता. वाळवा), गणेश ऊर्फ अजित मागनगिरी (रा. सांगोले), सुरेश कोळी (रा. कोल्हापूर) आणि आकाश सावंत (रा. लेंगरे, ता. खानापूर) यांचा समावेश आहे. टोळीतील राजकुमार मच्छवे (रा. दरफळ, जि. धाराशिव) हा संशयित सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिस चौकशीत आरोपींनी ताकारी बसस्थानकाजवळील ‘महालक्ष्मी’ सराफी दुकानाची भिंत फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरीत सुमारे 9.34 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी सराफी दुकानदार महेश पाटील यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपीस अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून, इतर गुन्ह्यांशी संबंध तपासला जात आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीमुळे महापालिकेच्या तिजोरीत चार दिवसांत 1 कोटींची भर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










