Sangli Today | नेर्ले : वाळवा तालुक्यातील माणिकवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, शुक्रवारी मध्यरात्री मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका मेंढीचा मृत्यू झाला तर तीन मेंढ्या जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माणिकवाडी (ता. वाळवा) येथील पशुपालक संदीप महादेव गडाळे यांनी आपल्या मेंढ्या काशिनाथ रेठरेकर यांच्या शेतात बसवल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात एक मेंढी जागीच ठार झाली, तर अन्य तीन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. पहाटे शेतात गेल्यानंतर गडाळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
दरम्यान, माणिकवाडीसह परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणेही धोक्याचे ठरत आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्याच्या या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी अश्विनी वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: फार्णेवाडीजवळ दुचाकीची दगडांच्या ढिगाला धडक; ‘हुतात्मा’चे माजी संचालक जयकर चव्हाण यांचा जागीच मृत्यू.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










