मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एका उमेदवाराच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भाजपच्या उमेदवार सुनीता व्हनमाने यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या हल्ल्यात घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
सुनीता व्हनमाने यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दहाजणांच्या टोळीने हा हल्ला केला. यावेळी काही वेळातच व्हनमाने यांचे समर्थक जमा झाल्याने अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर दुचाकींवरून पसार झाले. या घटनेचे काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपांचा इतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून इन्कार करण्यात आला असून, हे आरोप निराधार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याआधीही याच प्रभागात काही दिवसांपूर्वी दोन गटांत वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती, मात्र त्यावेळी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे इस्राईलनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पूर्वतयारी बैठक; उमेदवार समन्वय व जनतेशी संवादावर चर्चा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










