ईश्वरपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे अपहरण झाल्याची गंभीर घटना गुरुवारी मध्यरात्री घडल्याची नोंद कासेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेत पतीसह सासू आणि दिराला मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता युवराज माने (वय १९) आणि युवराज बाळासाहेब माने (वय ४०, रा. नेर्ले) यांनी तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता, असे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांमधून आलेल्या काही जणांनी माने यांच्या घरात प्रवेश केला. दरवाजा तोडून आत शिरल्यानंतर पती युवराज माने यांना काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरडाओरड ऐकून मदतीसाठी धावून आलेल्या आई सुमन माने आणि भाऊ धनाजी माने यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर नम्रता माने यांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप पतीने केला आहे. याप्रकरणी नम्रताचे वडील, आई यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, विवाहितेचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: तासगावजवळ पिस्तूल विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; तरुणाकडून दोन पिस्तूले व जिवंत काडतूस जप्त.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










