सांगली : सावळी–तानंग रस्त्यावर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक रिक्षाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या अपघातात आनंदा सिद्धा मेटकरी (वय ४५, रा. संजयनगर, सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. ते बुधवारी दुपारी दुचाकीवरून तानंग मार्गे सावळीकडे जात असताना, एका कोल्ड स्टोअरेजसमोर समोरून येणाऱ्या मालवाहतूक रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर आनंदा मेटकरी हे रस्त्यावर पडले. डोक्याला व हाता पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृत मेटकरी यांचे भाचे दीपक दुधाळ यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मालवाहतूक रिक्षा चालक विजय गणपती कोरे (वय ४७, रा. मिरज) याच्याविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: सलग चार दिवस बँका बंद राहणार; 27 जानेवारीला देशव्यापी बँक संप.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










