सांगली : शिराळा तालुक्यातील बिऊर गावात गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा चिमुरडा ठार झाला. घराच्या अंगणात मित्रांसोबत खेळत असलेल्या राजवीर पाटील (वय ४) याच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी शिराळ्यातील वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याला जबड्यात पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. सोबतच्या मुलांनी व कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मुलाला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत राजवीरला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांचा संताप उफाळून आला. परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप करत संतप्त जमावाने शिराळ्यातील वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयातील काचा, फर्निचर व साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला. ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत तसेच मृत मुलाच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा: सांगलीतील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! विहीर, पंप, सोलर व सिंचनासाठी लाखोंचे अनुदान.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










