सांगली : आष्टा (ता. वाळवा) येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना विविध बँकिंग सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक विशाल कुमार सिंग, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन तसेच बँकेचे अधिकारी राहुल गुप्ता उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी बँकिंग व डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले.
नवीन शाखेमुळे बचत व चालू खाते, कर्जविषयक सेवा तसेच डिजिटल बँकिंगसह विविध सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. या भागातील ग्राहकांना याचा थेट लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ यांनी बँक ऑफ इंडियाच्या कामकाजाची माहिती दिली. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून बँक ऑफ इंडियाने स्थापनेपासून सातत्याने विस्तार केला असून, सध्या देशभरात पाच हजारांहून अधिक शाखा कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील ही बँकेची ४१ वी शाखा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: ट्रॅक्टर सबसिडीच्या आमिषाने मिरजेत सात शेतकऱ्यांची फसवणूक; ३५ लाखांचा गंडा, एकावर गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










