ईश्वरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद गटांच्या निकालाकडे पाहता, एकूण 11 पैकी 8 गटांमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला असून महायुतीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
रेठरे हरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, पेठ, बोरगाव, बावची आणि येलूर या गटांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर चिकुर्डे मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवाराने विजय मिळवला. कामेरी गटात भाजप, वाळवा गटात शिवसेना (शिंदे गट) तर बागणी गटात रयत क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला.
हेही वाचा: कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व; जिल्हा परिषद व पंचायत समितीत बहुमत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










