हरिपूर (ता. मिरज) : महाशिवरात्रीनिमित्त हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली. कृष्णा-वारणा संगमावर वसलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच “ॐ नमः शिवाय”, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले.

काकड आरती, रुद्राभिषेक, महाआरती, दुपारी महापूजा आणि सायंकाळी पालखी सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
रात्री दहा वाजेपर्यंतही मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. रविवारची सुटी आणि महाशिवरात्र एकत्र आल्याने संध्याकाळनंतर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
देवस्थान समितीतर्फे पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची तसेच सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध खेळणी, खाद्य दुकानांची रेलचेल होती.
महाशिवरात्रीनिमित्त हरिपूरमध्ये दिवसभर शिवभक्तांचा उत्साह आणि श्रद्धेचा माहोल पाहायला मिळाला.
हेही वाचा: शिवरायांच्या संदर्भातील वक्तव्यावरून सांगलीत राजकीय तापमान वाढले; काँग्रेस भवनसमोर भाजपचा निषेध.
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी
- Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाचे थैमान; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार का?
- ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ₹३९१ कोटींचा निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार पगार?
- Gold Price Prediction 2036: येत्या दशकात सोन्याचा भाव कुठे पोहोचेल? जुन्या आकडेवारीवर आधारित गणित काय सांगतय, वाचा सविस्तर
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदीपूर्वी पाहा सांगली, पुण्यासह PNG चे आजचे दर (२७ ऑक्टोबर २०२६)
- Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला, पारा ३६ पार; ‘या’ ३ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, पाहा आजचा हवामान अंदाज









