भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ३७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी स्वागत हॉटेलजवळ घडली असून अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे.
मृत युवकाचे नाव अजय अशोक कदम (रा. माळवाडी) असे आहे. ते खंडोबाचीवाडीहून माळवाडीकडे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून घरी जात होते. स्वागत हॉटेलजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते वाहनात अडकून काही अंतर फरफटत गेले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र वाहनचालक न थांबता तेथून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
भिलवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा: एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










