वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील स्टोन क्रशर परिसरात डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दत्तात्रय बारपटे (वय 55, रा. कामेरी ता. वाळवा) हे डंपर चालक म्हणून काम करत होते.

दि. 5 मार्च रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास ऐतवडे बुद्रुक येथील पार्वती स्टोन क्रशर परिसरातून क्रश सॅन्ड घेऊन ते रेठरे धरणाकडे जात असताना त्यांचा अशोक लेलंड कंपनीचा डंपर चढावरून मेन रोडवर येताना नियंत्रणाबाहेर गेला.

डंपरवरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक राजेंद्र बारपटे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने उपचारासाठी इश्वरपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी उपचार सुरु करून अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बरगड्या फ्रॅक्चर झाल्याचे सांगून पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले, त्यानंतर बारपटे यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना रात्री सुमारे 8.15 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

कुरळप पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

येथे वाचा: Sangli Accident News Today.

हेही वाचा: सांगलीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; प्रसूतीनंतर नवजात बाळाला सोडून आई गायब.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा