आष्टा : आष्टा-इस्लामपूर रोडवर दुचाकीची धडक होऊन एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर निवृत्ती मोरे (वय 26, रा. चांदोली वसाहत, आष्टा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 12 मार्च रोजी रात्री सुमारे 9 वाजता आष्टा-इस्लामपूर रोडवरील प्रज्ञेश अॅग्रो सेल्स दुकानाजवळ घडली.
मोरे हे आपल्या मामेभावासोबत दुचाकीवरून जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असताना मागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात मोरे यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, अपघातानंतर दोघांनाही 108 रुग्णवाहिकेद्वारे आष्टा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरे यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले असून विनायक किरण शेखर (रा. इस्लामपूर) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










