Sangli Fodder Supply: सांगली जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची तयारी; मुरघास (₹८/किलो) व सुका चारा (₹१२/किलो) पुरवठ्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्ह्यात चारा पुरवठ्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; मुरघास व सुक्या चाऱ्याचे दर निश्चित (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सन २०२६-२७ मध्ये सांगली जिल्ह्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवल्यास पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आगाऊ नियोजन सुरू केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार आणि आपत्कालीन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चारा छावण्या व चारा डेपोमध्ये मुरघास आणि सुका चारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यानुसार सेवाभावी संस्था, उत्पादक आणि पुरवठादारांकडून २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा: सांगलीत आरटीओच्या ‘फेसलेस’ सेवांना मोठा प्रतिसाद; २१ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला घरबसल्या लाभ.

अधिकृत दर आणि चाऱ्याच्या दर्जाबाबत महत्त्वाचे निकष 

शासनाच्या ३० ऑक्टोबर २०२६ च्या निर्णयानुसार चारा पुरवठादारांसाठी खालील दर आणि तांत्रिक अटी निश्चित करण्यात आल्या आहेत:

  • चाऱ्याचे कमाल दर: मुरघासासाठी कमाल ₹८ प्रति किलो, तर सुक्या चाऱ्यासाठी कमाल ₹१२ प्रति किलो (वाहतूक खर्च वगळून) दर निश्चित करण्यात आला आहे.
  • प्रयोगशाळा तपासणी बंधनकारक: चाऱ्याची मानके आणि विविध घटकांची तपासणी शासनाने नमूद केलेल्या अधिकृत प्रयोगशाळेत करून घेणे बंधनकारक राहील.
  • वजन काटा पावती व वाहतूक: चारा पुरवठा करताना भरलेल्या आणि रिकाम्या गाडीची वजन काटा पावती तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे दर आरटीओने निर्धारित केल्यानुसार अनुज्ञेय असतील.
  • निशुल्क चारा पुरवठा: जे पुरवठादार, सेवाभावी किंवा गोरक्षण संस्था निशुल्क दराने चारा पुरवठा करण्यास इच्छुक आहेत, त्यांनीही आपली नावे व पुरवठा करू इच्छिणाऱ्या गावांची माहिती प्रशासनास कळवावी.

हेही वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीत मोठी प्रगती; आतापर्यंत १६२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण, उरलेल्या २४७ गावांचे काम वेगाने सुरू.

अर्ज कुठे आणि कसा सादर करावा? 

अर्जाचा विहित नमुना जिल्हाधिकारी सांगली यांच्या sangli.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक पुरवठादारांनी जिल्हाधिकारी, सांगली यांच्या नावे केलेले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह बंद लिफाफ्यामध्ये २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत टपालाने किंवा समक्ष सादर करावेत.

हेही वाचा: बँकेत रांगेत उभे राहण्याची गरज नाही! आता घरबसल्या मोबाईलवरून ‘असा’ काढा हयातीचा दाखला; ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष अभियान.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: 

जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवार, मिरज.

चारा पुरवठा आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणी तात्काळ पुरवठा करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मिरज येथील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन पीक नोंदणी रखडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आता ‘ई-फेरफार’ प्रणालीद्वारे ग्राम महसूल अधिकारी स्तरावर होणार पीक पाहणी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा