Pune-Bengaluru Expressway Route: पुणे ते बंगळूर प्रवास ७ ते ८ तासांत होणार; ५० हजार कोटींचा नवा ग्रीनफील्ड महामार्ग सांगलीतील ४ तालुक्यांतून जाणार, जाणून घ्या संपूर्ण रूट

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
पुणे-बंगळूर नव्या ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचा मार्ग सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून जाणार; १२ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गाचा संपूर्ण रूट जाणून घ्या. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सध्याच्या पुणे-बंगळूर (कोल्हापूर-बेळगाव मार्गे) राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित नवा पुणे-बंगळूर ‘ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे’ (Pune-Bengaluru Greenfield Expressway) आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या ‘भारतमाला व्हिजन २०४७’ मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी महामार्गाचा प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून, केंद्रीय कॅबिनेटच्या अंतिम आर्थिक मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.

५० हजार कोटींचा प्रकल्प आणि २१ हजार एकर भूसंपादन 

या नव्या महामार्गामुळे पुणे ते बंगळूर हा प्रवास अवघ्या ७ ते ८ तासांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ७०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या या प्रकल्पासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्रातील ३ जिल्हे आणि कर्नाटकातील ९ जिल्हे अशा एकूण १२ जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. यासाठी २१ हजार एकरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जाणार असून, भूसंपादन व पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांतून जाणार महामार्ग

नव्या पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील वर्वे कंजाळे येथून होणार आहे. पुढे भोर आणि पुरंदर तालुक्यांतून निरा नदी ओलांडून हा मार्ग सातारा जिल्ह्यातील खंडाळा (पारगाव), फलटण, माण आणि खटाव तालुक्यांतून सांगली जिल्ह्यात प्रवेश करेल. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी व कोरडवाहू पट्ट्यातील खानापूर (विटा), तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज (महाराष्ट्र हद्दीपर्यंत) या चार तालुक्यांतून हा महामार्ग पुढे जाणार असल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

हेही वाचा: “३,५०० कोटींचे कारखानदारांचे कर्ज आणि OTS माफी आता चालणार नाही”; विट्यातून आ. गोपीचंद पडळकर यांचा थेट इशारा, टेंभू-म्हैसाळ निधीचाही मांडला हिशोब.

कर्नाटकातील प्रमुख मार्ग (रूट) 

मिरज तालुक्यातून पुढे कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर हा महामार्ग बेळगाव, अथणी, रामदुर्ग, बागलकोट-जमखंडी, मुधोळ, गदग-नरगुंद, कोप्पळ-यलबर्गा, ककनूर, विजयनगर-होसपेट, कुरीर्गी, दावणगिरे-जगलूर, चित्रदुर्ग, तुमकूर-सिरा, मधुगिरी आणि कोर्टागिरी मार्गे बंगळूर (ग्रामीण) येथील डोड्डाबळ्ळापूर व नेलमंगला येथून पुढे बंगळूरच्या सॅटेलाईट रिंग रोडला जोडला जाणार आहे.

हेही वाचा: लाडक्या बहिणींचे १,५०० रुपये नेमके कुठे खर्च होतात? राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर; बचत वाढली पण उत्पन्नाचे साधन मात्र नगण्य.

📢 सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा