AgriStack Farmer ID Maharashtra: दुष्काळी मदत आणि कृषी योजनांसाठी २५ नोव्हेंबरपूर्वी ‘फार्मर आयडी’ व ई-केवायसी पूर्ण करा; आवश्यक कागदपत्रे व शासनाचे महत्त्वाचे आवाहन

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅकबाबत शासनाची महत्त्वाची सूचना! (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ थेट आणि विनाअडथळा मिळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (AgriStack) प्रणालीमध्ये आपली माहिती अद्ययावत करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपला ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करून घ्यावा, असे महत्त्वाचे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे. राज्यातील सर्व खातेदार शेतकरी, वनपट्टाधारक शेतकरी आणि पीएम-किसान योजनेतील सक्रिय लाभार्थ्यांची नोंदणी २५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदतीची रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा होण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीवरील आवश्यक नोंदणी व पडताळणी पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ही नोंदणी किंवा ई-केवायसी प्रलंबित राहिली, तर संबंधित शेतकऱ्यांना कृषी अनुदान आणि आपत्कालीन मदतीचा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

फार्मर आयडी हा शेतकऱ्याची स्वतंत्र ओळख दर्शवणारा डिजिटल क्रमांक असून, तो तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी (CSC) अर्थात नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. या केंद्रावर नोंदणीसाठी जाताना शेतकऱ्यांनी चार महत्त्वाची कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे; यामध्ये स्वतःचे आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, जमिनीचा सातबारा (७/१२) उतारा आणि आठ-अ (८-अ) उतारा यांचा समावेश आहे.

हेही वाचा: शासकीय राजपत्राद्वारे नाव, जन्मतारीख आणि धर्म बदल करणे झाले सोपे; अवघ्या १५ दिवसांत मिळते सेवा, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे.

शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅकबाबत शासनाची महत्त्वाची सूचना

दरम्यान, फार्मर आयडीबाबत शासनाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सावधगिरीची सूचनाही दिली आहे. सीएससी केंद्रांनी फार्मर आयडीच्या आधारे कोणतेही स्वतंत्र कागदी किंवा प्लास्टिक ओळखपत्र तयार करणे व वितरित करणे पूर्णपणे अनधिकृत असून अशा ओळखपत्रांना शासनाची कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्लास्टिक ओळखपत्रांसाठी कोणतेही पैसे देऊ नयेत. गावपातळीवर ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करणार असून, सर्व पात्र शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: ७/१२ उताऱ्यावर तुमच नाव आहे, पण जमीन खरच तुमचीच आहे का? ६ परिस्थितींत मालकीवर होऊ शकतो दावा; खरेदीखत, फेरफार आणि सातबाऱ्याचा कायदेशीर नियम जाणून घ्या.

📢 महाराष्ट्रातील नवीन सरकारी योजना, शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा