Jewellery Theft: आरवडेत शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचे दागिने हिसडा मारून पळविले; चोरट्यांचे धूमस्टाईलने पलायन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Jewellery Theft (प्रातिनिधिक छायाचित्र)

तासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती आहे.

याप्रकरणी कविता केशव चव्हाण (वय 48, रा. आरवडे) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता चव्हाण या आरवडे–मांजर्डे रस्त्यालगत असलेल्या शेतात वैरण काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना भीती दाखवून गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले.

क्षणातच दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. मात्र, चोरट्यांनी दाखविलेल्या भीतीमुळे धास्तावलेल्या कवितांनी दहा दिवसांनंतर पोलिसांत तक्रार दिल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

तासगाव पोलिस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरवडे परिसरात विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा: ईश्वरपूरात लॉजवर सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त; व्यवस्थापकासह तीन जण अटकेत, परराज्यातील युवतीची सुटका.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा