Jath : जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची अडचण वाढली

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Jath Crop Loss Rain Damage 2025 - Sangli Today Photo

Jath News Today | सांगली : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीत केलेली गुंतवणूक आणि मेहनत या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली असून अनेक घरांची पडझड झाल्याने कुटुंबांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

रविवारी माजी आमदार, विक्रमसिंह सावंत आणि खासदार विशाल पाटील यांनी जत तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी व वेदना प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. पाहणीदरम्यान प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले गेले तसेच राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

संकटाच्या या काळात शेतकरी बांधवांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी माहिती या पाहणीवेळी देण्यात आली.

हेही वाचा: इस्लामपूर अपघातातील जखमी पेठच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा