सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असून, महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा दावा आमदार सुरेश खाडे यांनी केला आहे.
मिरज येथील प्रभाग क्रमांक ७ आणि प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना बोलताना आमदार खाडे म्हणाले की, सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात विकासाची कामे भाजपच्या माध्यमातूनच झाली आहेत. निधी देताना कोणताही पक्ष, जात किंवा धर्म पाहिला गेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप स्वबळावर सर्व ७८ जागांवर निवडणूक लढवत असून, पक्ष संघटितपणे आणि ताकदीने मैदानात उतरल्याचे खाडे यांनी सांगितले. काही नेते किंवा कार्यकर्ते पक्ष बदलत असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, भाजपमधून कोणीही बाहेर पडलेले नाही, असा दावा केला.
महापालिकेचे उत्पन्न मर्यादित असले तरी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. मागील कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज छाननीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे सांगत सर्व भाजप कार्यकर्ते आणि नेते एकत्रितपणे ही निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत असे आमदार खाडे म्हणाले.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील हे गाव बनत आहे ‘आदर्श गाव’; लोकसहभागातून बदलले चित्र.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










