सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडमच्छिंद्र गावात शेजाऱ्यांमधील वादातून एका दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळी घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे बापुराव जयसिंग पाटील (वय 40) हे सायंकाळी आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी दारात उंदीर सोडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून रमेश पाटील, महावीर पाटील, संकेत पाटील आणि श्रेयश पाटील यांनी संगनमत करून बापुराव पाटील यांच्यावर लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीच्या घटनेत बापुराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनाही ढकलून जखमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा: सांगली ‘महापालिकेवर भाजपच कमळ फुलेल’; आमदार सुरेश खाडे यांचा दावा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










