तासगाव : राज्यभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत स्वतःचा एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार रोहित पाटील यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात दरवर्षीच अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा: ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठ्या नफ्याचे आमिष; डॉक्टरला 14 लाखांचा गंडा.