आष्टा : (सांगली) : मुलीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वाळवा तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची साडेबारा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हमजेखान गुलाब मुजावर (वय 69, रा. इस्लामपूर रोड, वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयित जहांगीर गुलाब गोलंदाज (रा. टाकाळा, कोल्हापूर) याने त्यांच्या मुलीला तलाठी पदावर नोकरी लावून देतो, असा दावा करत विश्वास संपादन केला.
डिसेंबर 2023 पासून विविध टप्प्यांत संशयिताने फिर्यादीकडून रोख 50 हजार रुपये तसेच आरटीजीएसद्वारे 12 लाख रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे नोकरी न मिळाल्याने तसेच पैसे परत न केल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
पैशांची मागणी केल्यानंतर संशयिताने पैसे परत देणार नसल्याचे सांगत धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या तक्रारीच्या आधारे आष्टा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









