सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील समडोळी गाव सध्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून हे गाव ‘आदर्श गाव’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या चौकटीत गावात विविध पातळ्यांवर उपक्रम राबवले जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये डिजिटल सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. गावातील सर्व शाळा डिजिटल पद्धतीने कार्यरत असून, ग्रामपंचायतीचे दाखले व सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आवश्यक सेवा मिळू लागल्या आहेत.
समडोळी गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेबरोबरच ओला व सुका कचरा वर्गीकरण व संकलनाची व्यवस्था राबवली जात आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR Code आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असून, त्यामुळे करभरणा प्रक्रियेत सुलभता आली आहे.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही गावात विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत अनिमिया तपासणी मोहीम, तसेच अंगणवाड्यांमध्ये परसबाग विकास करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी गावातील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
याशिवाय, ग्रामस्थांच्या सहभागातून ‘शिवार फेरी’सारखे उपक्रम राबवले जात असून, शेती, पर्यावरण आणि गावपातळीवरील समस्या यावर थेट संवाद साधला जात आहे. विविध शासकीय प्रमाणपत्रांद्वारे सन्मानित झालेले समडोळी गाव प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून विकासाचा आदर्श उभा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
समडोळी गावचा हा विकास केवळ प्रशासनाचा नसून, प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचा, प्रत्येक समडोळीकरांच्या जिद्दीचा आणि सोबतीचा आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेत उमेदवारी अर्जांचा गोंधळ; शेवटच्या दिवशी शेकडो अर्ज दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










