वाळवा : कार्वे (ता. वाळवा) येथून अंगणात खेळताना अचानक बेपत्ता झालेली पाच वर्षांची चिमुकली अखेर कराड परिसरात सुखरूप सापडल्याने कुटुंबियांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवातीला बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र पोलिस तपासात हा अंदाज खोटा ठरला असून, मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन्सी प्रकाश चव्हाण (वय ५) ही लहान मुलगी रविवारी सायंकाळी आपल्या आजोबांच्या शेतातील घराच्या अंगणात खेळत होती. तिची आई तिला जेवण भरवत होती पाणी आणण्यासाठी आई घरात गेली असता काही क्षणांतच आर्यन्सी अंगणातून गायब झाल्याचे लक्षात आले. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस, महसूल विभाग आणि रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत तसेच सोमवारी सकाळीही ड्रोनच्या साहाय्याने परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही बिबट्याचे ठोस पुरावे न आढळल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कराड परिसरात शोध घेऊन आर्यन्सीला सुखरूप ताब्यात घेतले. सध्या ती कुरळप पोलिसांच्या ताब्यात आहे.
या प्रकरणी मुलीचे आजोबा कृष्णात पाटील यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली असून, नेमके कोण व कोणत्या उद्देशाने मुलीला घेऊन गेले, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितले की, “मुलगी सुरक्षित आहे. या प्रकरणात अपहरणाचा प्राथमिक संशय असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल.”
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










