Sangli DCC Bank Chairman: सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड; निवड प्रक्रियेला आमदार गोपीचंद पडळकर गैरहजर

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (बुधवार, दि. १८) बिनविरोध पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) संचालक तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नूतन संचालक मंडळाची ही पहिलीच बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवड प्रक्रियेला बँकेच्या २१ पैकी २० संचालकांनी हजेरी लावली होती, तर आमदार गोपीचंद पडळकर हे एकमेव संचालक गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: नांद्रे व कर्नाळमधील तीन मंदिरांना राज्य शासनाचा ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा; परिसरातील मूलभूत सुविधा व विकासकामांसाठी निधीचा मार्ग मोकळा.

पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणे

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी १५ जण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ६ जागांसाठी मतदान झाले होते. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसचे ६, भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३ आणि शिवसेना (शिंदे गट) ३ असे संचालक आहेत.

आकड्यांच्या गणितात महायुतीचे ११ आणि महाविकास आघाडीचे १० संचालक दिसत असले तरी प्रत्यक्ष सत्ता स्थापनेची समीकरणे वेगळी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संचालक रणधीर नाईक यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची भूमिका जाहीर केली, तर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. तसेच जिल्हा परिषदेच्या धर्तीवर शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांनीही महाविकास आघाडीला साथ दिल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकीत सर्वाधिक जागा असलेल्या काँग्रेसकडे अध्यक्षपद देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. त्यानुसार अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड आणि उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन ही निवड बिनविरोध पूर्ण झाली.

हेही वाचा: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; १ जानेवारी २०२७ पासून नवे नियम लागू, ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ — अशी करा नोंदणी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा