सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावर भीषण अपघात; रक्षाविसर्जनासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव गाडीची धडक, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीच्या कोल्हापूर रस्त्यावर दोन दुचाकींची भीषण धडक; अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): शहरातील कोल्हापूर रस्त्यावर चिंतामणी हॉलसमोर दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. हनुमाननगर परिसरातील रहिवासी सुरेश बसप्पा हदीमनी (वय ५०) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या दुर्घटनेत गुलाब कॉलनी येथील गुणधर शंकर आवळे (वय ७०) आणि कर्नाटक राज्यातील गोकाक तालुक्यातील बेनचंदमर्डी येथील रहिवासी रमेश उद्धप्पा खिलारे (वय ३५) हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश हदीमनी आणि गुणधर आवळे हे दोघेजण बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर येथून अमरधाम स्मशानभूमीकडे रक्षाविसर्जनाच्या विधीसाठी दुचाकीवरून (क्रमांक एमएच १०, ईएफ ५८४०) निघाले होते. ते शंभरफुटी रस्त्यावरून कोल्हापूर रस्त्यावर येत होते.

त्याच वेळी रमेश खिलारे हे सांगली बसस्थानकाकडून अंकलीच्या दिशेने आपल्या मित्रासोबत दुसऱ्या दुचाकीवरून (क्रमांक केए २८, एचयु ९९१) गोकाककडे जात होते. दोन्ही रस्त्यांच्या कोपऱ्यावर भरधाव वेगात असलेल्या खिलारे यांच्या दुचाकीने हदीमनी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

हेही वाचा: घरकुल लाभार्थ्यांचे शासकीय कार्यालयांचे हेलपाटे संपले; शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज, ११ कागदपत्रे आवश्यक.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलीस व १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, अर्धा तास उलटूनही शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अखेर उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत जखमींना खासगी वाहनातून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना सुरेश हदीमनी यांची प्राणज्योत मालवली, तर जखमी गुणधर आवळे व रमेश खिलारे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय; अपवादात्मक प्रकरणांतील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळण्याचा मार्ग मोकळा, त्रिस्तरीय कार्यपद्धती निश्चित.

📢 सांगली जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, प्रशासन आणि महत्त्वाचे शासन निर्णय (GR) सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा