Vasantdada Patil Jayanti: “दादा, तुमच बोट धरून चालायला शिकलो, पण विचारांच गाठोड पेलण्यासाठी आयुष्यही कमी पडेल”; खासदार विशाल पाटलांच भावनिक पत्र

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
स्व. वसंतदादा पाटील यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त खासदार विशाल पाटील यांनी भावूक पत्रातून जुन्या आठवणींना दिला उजाळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. या निमित्ताने वसंतदादांचे नातू आणि सांगलीचे खासदार विशाल प्रकाशबापू पाटील यांनी एक अतिशय भावनिक पत्र लिहून आपल्या आजोबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. “वयाच्या अवघ्या आठ-नऊ वर्षांपर्यंतच तुमचा सहवास लाभला, पण तुम्ही जपलेल्या विचारांच गाठोड इतक मोठ आहे की, ते पेलण्यासाठी संपूर्ण आयुष्यही कमी पडेल,” अशा शब्दांत खासदार विशाल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘कमी शिक्षण असूनही माणस वाचण्याची विलक्षण नजर’ 

आपल्या पत्रात खासदार विशाल पाटील यांनी वसंतदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्यशैलीचे अनेक पैलू उलगडले आहेत. शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत व ग्रामीण महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळावी, यासाठी दादांनी आयुष्यभर संघर्ष केला. कमी शिक्षण असूनही माणस वाचण्याची आणि त्यांच्या मनातल ओळखण्याची दादांची नजर विलक्षण होती. त्यामुळेच आजही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी किती फी लागते? सामान्य आणि तत्काळ पासपोर्टचे नवे दर व कागदपत्रांची संपूर्ण यादी पहा.

२०२४ च्या लोकसभा विजयामागे दादांच्या नावाची ताकद 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या ऐतिहासिक विजयाचा संदर्भ देत विशाल पाटील यांनी जनतेच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात दादांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे हेच प्रेम माझ्या विजयात मोठी भूमिका पार पाडणारे ठरले. त्यावेळी पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी ही जनता का उभी राहते, याची प्रचिती आली. दादा, तुमच नाव आणि वारसा ही अभिमानाची गोष्ट आहेच, शिवाय ती एक मोठी जबाबदारीही आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संकल्प व्यक्त केला.

वसंतदादा आज प्रत्यक्ष नसले तरी त्यांचे विचार, कार्य आणि त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे आजही आपल्यासोबत असून, त्यांच्या आठवणींचा हा वारसा अविरत ऊर्जा देत राहतो, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी दादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.

हेही वाचा: “जिल्हा बँकेत चाबूक घेऊन गेलो आहे, आता जाब विचारणार”; आटपाडीतील सत्कार सोहळ्यात आमदार गोपीचंद पडळकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा