सोलापूर-मिरज एक्सप्रेसचा विस्तार सांगली रेल्वे स्थानकापर्यंत करा; सांगलीतील प्रवाशांची मध्य रेल्वेकडे जोरदार मागणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सोलापूर-मिरज एक्सप्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करण्याची प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली / मिरज (सांगली टुडे वृत्तसेवा): मध्य रेल्वेच्या सोलापूर-मिरज या मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक ०१४१९/०१४२० सोलापूर-मिरज एक्सप्रेसचा विस्तार सांगली रेल्वे स्थानकापर्यंत करण्यात यावा, अशी जोरदार मागणी सांगली शहर व परिसरातील रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.

सध्या ही एक्सप्रेस मिरज स्थानकावरच थांबत असल्याने सांगलीला येणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रिक्षा किंवा इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ही गाडी सांगलीपर्यंत वाढवल्यास सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कवठेमहांकाळ तसेच सांगली जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून रेल्वेच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: मुंबई ते सांगली आणि बंगळुरू प्रवास होणार अतिजलद; नव्या महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर.

सांगली शहर हे जागतिक हळदीची बाजारपेठ, आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना तसेच देशातील प्रमुख गूळ व बेदाणा बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित रुग्णालये आणि शैक्षणिक संकुलांमुळे सांगलीत दररोज राज्यभरातून व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांची मोठी वर्दळ असते.

जर सोलापूर-मिरज ऐवजी सोलापूर-सांगली एक्सप्रेस चालवण्यात आली, तर प्रवाशांना मिरज आणि सांगली असे दोन्ही महत्त्वाचे थांबे एकाच गाडीत उपलब्ध होतील. यामुळे सोलापूर व पंढरपूरकडून येणारे प्रवासी थेट सांगली शहरात पोहोचू शकतील आणि सांगलीकरांनाही विठ्ठलनगरी पंढरपूर व सोलापूरकडे जाण्यासाठी थेट सोयीस्कर गाडी मिळेल.

प्रवाशांची वाढती गरज आणि रेल्वेचा आर्थिक फायदा लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि गाडी क्रमांक ०१४१९/०१४२० चा विस्तार सांगली रेल्वे स्थानकापर्यंत करावा, अशी आग्रही मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: आता एजंटशिवाय घरबसल्या काढा तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र; ‘आपले सरकार’ने जाहीर केली कागदपत्रांची यादी आणि १५ दिवसांची मुदत.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा